Share

दोस्तीत कुस्ती : पुण्यात कॉंग्रेसला खिंडार; दिग्गज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

पुणे : राज्यात सत्तेचा एकत्रितपणे उपभोग घेणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यामध्ये कॉंग्रेसला जोरदार झटका दिला आहे. कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पक्षात प्रवेश देत कॉंग्रेसला अक्षरशः खिंडार पाडले आहे. अनेक दिग्गज नेत्यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना यश आले आहे.

माजी महापौर व ज्येष्ठ नेते शांतिलाल सूरतवाला, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे (VBA), माजी नगरसेविका वैजयंती पासलकर,राजाभाऊ पासलकर, रमेश भांड ( उपाध्यक्ष पुणे शहर कॉंग्रेस ) आणि सलीम शेख यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी प्रशांत जगताप, ज्येष्ठ गायक व पक्षाचे नेते आनंद शिंदे, प्रदीप गारटकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार  यांच्या नेतृत्वावर व विचारांवर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत असे या नेत्यांनी सांगितले. आदरणीय पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि आदरणीय अजितदादांची दूरदृष्टी व विकासकामांप्रति असलेले झपाटलेपण यामुळे निश्चितच राज्याचा आणि पुण्याचा विकास होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पुणे शहराला पुन्हा विकासवाटेवर आणू शकतो, असा विश्वास या वेळी सर्व नेत्यांनी पक्ष प्रवेश करताना व्यक्त केला.

पवार साहेब व आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. यामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे. तसेच, पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत सत्तापरिवर्तनाच्या मोहिमेला बळ मिळणार आहे, असा विश्वास पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!