Share

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या परदेशी नागरिकांना मिळणार आता अमेरिकेत प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

न्यूयॉर्क – अमेरिकेने लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या परदेशी नागरिकांना नोव्हेंबर महिन्याच्या 8 तारखेपासून प्रवेश देण्याचे घोषित केले आहे.सार्वजनिक आरोग्याचा विचार करून सुसंगत आणि तरीही पळवाट नसलेलं हे धोरण आहे असं व्हाईट हाउसचे सहाय्यक प्रवक्ते केविन मुनोझ यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

या नवीन धोरणानुसार प्रवाश्यांकडे लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचा पुरावा तसंच प्रवासाआधीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे.अमेरिका भेटीसाठी अत्यावश्यक कारण नसलेल्या तसंच भूमार्गाने येणाऱ्या प्रवाश्यांना देखील हे नियम पाळणं बंधनकारक असेल.33 युरोपीय देशांसह भारत, ब्राझील, चीन, इराण आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना हे नवीन नियम लागू आहेत.

दरम्यान, भारत सरकारनं चार्टर्ड विमानांद्वारे येणाऱ्या परदेशी पर्यटकांना देशात प्रवेश करण्यास परवानगी दिली असून, त्यांना कालपासून नवीन पर्यटक व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या कोविड-19 नियमांचे पालन करणे परदेशी पर्यटक आणि त्यांना आणणाऱ्या कंपन्यांना अनिवार्य असल्याचं गृह मंत्रालयानं आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!