Share

नवज्योत सिंह सिद्धूंची तलवार अखेर म्यान, राजीनामा मागे घेतल्यानंतर म्हणाले….

Published On: 

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. यामुळे सिद्धूच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कायम राहणार आहे. काही महिन्यातच पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पक्षांतर्गत वादाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आतापासूनच मोर्चेबांधणी केली जात आहे असं दिसत आहे.

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सिद्धूंची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर सिद्धूंनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. नवज्योत सिंह सिद्धूंनी बैठकीनंतर म्हटलं की, आता सर्व काही व्यवस्थित झालं आहे. मी हायकमांडला माझ्या मनातील काळजी सांगितली. राहुल गांधी, प्रियांका गांधी जो काही निर्णय घेतील तो पंजाबसाठी चांगला असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी त्यांना सर्वोच्च मानत असून त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे, असं सिद्धू यांनी सांगितलं.

काँग्रेसचे नेते हरिष रावत यांनी सांगितलं की, सिद्धू यांनी आपले मुद्दे राहुल गांधींसमोर मांडले. यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल असं सांगण्यात आलं. यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली जाईल असं आश्वासन दिलं, असं हरीश रावत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!