मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.
राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. १२ मे, २०२१ रोजी लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशातील परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या नियमामध्ये सुधारणेबाबतचे आदेश राज्य शासनाने आज जाहीर केले आहेत. हे आदेश दि. १२ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील.
मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: दोन पेक्षा जास्त लोक (एक चालक+ क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी तीन व्यक्ती (दोन चालक+ क्लीनर/ मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्र राज्याबाहेरुन प्रवास करुन राज्यात येत असतील तर त्यांच्या शरीराचे तापमान व इतर लक्षणे तसेच ‘आरोग्य सेतू’ मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश मिळेल. जर यापैकी एकाही व्यक्तिला लक्षणे असतील किंवा ताप असेल किंवा ‘आरोग्य सेतू’ मधील त्यांची स्थिती ‘सुरक्षित नाही (नॉट सेफ)’ अशी असेल तर त्या सर्वांना जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये पुढील तपासणीसाठी दाखल करण्यात येईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढेल – केदार
- जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या खासदाराला अटक
- ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचे आता थेट सोनिया गांधींना पत्र
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या टेस्ट करा ; मोदींचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

