🕒 1 min read
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेतली. कोरोनाविरोधातली लढाई, पर्यावरण बदल आणि हिंद प्रशांत क्षेत्रातलं स्थैर्य या मुद्द्यांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. कोरोनाच्या आव्हानाचा सामना करताना अध्यक्ष बायडन आणि अमेरिकेनं पार पाडलेल्या भूमिकेचं मोदी यांनी कौतुक केलं. जगाच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे दृढ संबंध असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं.
पुढच्या आठवड्यात महात्मा गांधी जयंती आहे, त्याचा उल्लेख करत बायडन यांनी सर्व जगासमोर गांधीजींच्या विचारांचा आदर्श असल्याचं सांगितलं. याचा धागा पकडत मोदी यांनी, जगाचे विश्वस्त बनून राहण्याबद्दल गांधीजी बोलत असत, असं सांगितलं. ही विश्वस्तपणाची भावना बरोबर घेऊनच भारत आणि अमेरिकेनं जगाच्या कल्याणासाठी काम करायला हवं, असं मोदी म्हणाले. या स्वतंत्र चर्चेनंतर मोदी आणि बायडन यांनी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली.
भारताच्या शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुन्गला हे सहभागी झाले होते. यानंतर मोदी यांनी क्वाड गटाच्या बैठकीत सहभाग घेतला. नेत्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत प्रथमच झालेल्या या बैठकीत मोदी आणि बायडन यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे अपडेट

