बीड : मराठवाडयात अतिवृष्टीमुळे शेतकरी उधवस्त झाला असून त्याला दोण महिण्याचा कालावधी संपला , दिवाळीपुर्वी नुकसान भरपाई देवू आशी घोषणा सरकारने केली , दिवाळी तर सोडा अध्याप 25% शेतकऱ्यांना सुध्दा अनुदान मिळाले नसून प्रशासनातले अधिकारी खोटा दावा करत आहे . वर्तमान परस्थीतीत सत्ताधारी शेतकऱ्यांचा फार पुळका आल्याची बतावणी करत असलें तरी अगोदर नुकसानीचे पैसे दया अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, परतीच्या पावसामुळे यंदा मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झाले. वास्तविक पाहता हे नुकसान एवढे आहे कि, यंदा खरिपाचे पीक एक टोपलं पण पदरात पडलं नाही. सरकारने दहा हजार रुपये प्रत्येक हेक्टरी देण्याची घोषणा केली, दिपावलीच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांना पैसे देऊ, अशा प्रकारचं जाहीर आश्वासन राज्य सरकार शेतकऱ्यांना दिले असताना आता दोन महिन्याचा कालावधी संपत आला तरि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नावावर अद्याप एक रुपया येऊन पडलेला नाही.
प्रशासनातले अधिकारी खोटे बोलतात. शेतकऱ्यांना तुमच्या नावावर रक्कम टाकल्याचा सांगतात. पण आतापर्यंत 25 टक्के रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एकीकडे वर्तमान राजकीय परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पुळक्याची भाषा सरकारचे मंत्री करतात? आम्हाला फार शेतकऱ्याचा कळवळा आहे असं दाखवतात? मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम सुद्धा अद्याप देत नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यात ज्या जिल्ह्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा दौरा झाला .त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अद्याप नुकसानीचे पैसे मिळालेले नाहीत. शेतकरी नुकसान भरपाई कधी येणार म्हणून रोज बँकाच्या दारात जात आहेमात्र खातं पाहिलं की सरळ बँके वाले सांगतात की तुमच्या नावावर एक रुपया आलेला नाही. ही शेतकऱ्यांची अवहेलना आणि अडवणूक जाणीवपूर्वक राज्य सरकार करत असल्याचा आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.
एकीकडे देशात सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनात सत्ताधारी पक्ष पाठिंबा देतात, मात्र दूसरीकडे शेतकऱ्यांचा संसार त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेला असतांना, एक रुपयाची मदत सरकार करत नाही, हा कुठला न्याय आहे? असा सवाल कुलकर्णी यांनी राज्य सरकारला केला आहे .
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- दानवे यांनी घेतलेली भूमिका हीच केंद्र सरकारची भूमिका आहे ? विरोधकांनी भाजपला घेरलं
- आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार!; ‘त्या’ रानगव्याला पुणेकरांची अनोखी श्रद्धांजली
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- धडक कारवाईत २७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; आतापर्यंत शहरातून एक कोटी दंड वसूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

