Share

निरोगी जीवनासाठी राज्यातील ‘या’ मंत्री महोदयांनी दिला रानभाज्या खाण्याचा सल्ला

Published On: 

🕒 1 min read

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला असताना निरोगी राहण्यासाठी मनुष्य धडपडतो आहे. नियमित व्यायाम व सकस आहारावर जोर देण्याबरोबरच सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश करून घेणे गरजेचे असल्याचा औषधी सल्ला राज्यातील एक मंत्री महोदयांनी दिलेला आहे.

महाराष्ट्राने वाचाळवीर नेते खूप अनुभवले. पण सर्वसमान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे नेते संख्येने कमीच सापडतील. सामान्यांना सकस आहार मिळावा म्हणून वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी थेट रानावनात नैसर्गिकरित्या उगविलेल्या भाज्यांचा पर्याय सुचविलेला आहे.

देवाच्या दारात मोहोळ भाजपमधील दुहीचे ‘दर्शन’; एकाच विषयावर, एकाच दिवशी, एकाच पक्षाची दोन स्वतंत्र आंदोलने

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करतांना संजय राठोड बोलत होते. ते म्हणाले, मानवी शरीरासाठी पौष्टिक असणार्‍या या भाज्यांचे महत्व व त्याचे फायदे आजच्या पिढीला अवगत व्हावे, या उद्देशाने मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्या सहकार्‍याने वनमंत्री म्हणून मी, रानभाज्या महोत्सवाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा घडवून आणली.

राष्ट्रवादीच्या आणखी एका युवा आमदाराला कोरोनाची लागण

त्यानुसार रानमहोत्सव सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने भाज्या घेऊन आले असून येथे असणार्‍या प्रत्येक भाजीचे वैशिष्ट्य आहे. रानातील, जंगलातील व शेतशिवरातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणा-या रानभाज्यांचे / रानफळांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती आजच्या परिस्थितीत नागरिकांना होणे काळाची गरज आहे.

पारनेरमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन

त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील नागरिकांसाठी विक्री व्यवस्था झाल्यास शेतक-यांचा या माध्यमातून आर्थिक फायदा होईल. तसेच पयार्याने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील, असेही पालकमंत्री म्हणाले. तत्पूर्वी पालकमंत्री संजय राठोड यांनी येथे लावण्यात आलेल्या विविध भाज्यांच्या स्टॉलला भेट देऊन प्रत्येक भाजीबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून रितसर महोत्सवाचे उद््घाटन केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ह्यरानभाज्यांचे महत्व आणि उपयोग या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या महोत्सवात १६ तालुक्यातून एकूण ८८ स्टॉल लावण्यात आले. यात अळू, हडसन, धोपा, सुरण, फांद, कुंदरा, कपाळकोडी, अंबाडी, कवठ, वाघाटी, शिरणी, वाळूक, आघाडा, केना, वज्रदंती, शतावरी, हेटीफुल, चिवड, मायाळू, शेवगा, वेलदोडी, भुईआवळा, खंडूचक्का, मसालापान, भोकर, नाय, सागरगोटी, गुळवेल, रानभेंडी, गवतीचाय, केळफुल, राजगीर, घोळ, जटाशंकर, शरपुंख, रानओवा, तोंडले, माटा, उंबर, रानतुळस आदी भाज्यांचा समावेश होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!