अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील सर्व मंदिरे सुरू करावीत या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील विविध मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ठाकरे सरकारने राज्यातील सर्व धंदे सुरू केले आहेत मात्र मंदिरे बंद ठेवण्यात आले आहेत. ही मंदिरे त्वरित उघडण्याची मागणी करत सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ द्यावी अशी मागणीही पारनेर तालुका भाजपच्या वतीने आज करण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन पाठविण्यात आले आहे.
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्याचे परीपत्रक काढूनही राज्य सरकारने भाविक भक्तांची मागणी असूनही मंदिरे सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे भाजपने राज्यभर घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून पारनेर तालुक्यातही विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
शनिशिंगणापूरमध्ये दार उघड उद्धवा दार उघडच्या घोषणांसह भाजपचा घंटानाद
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, भाजपचे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे, भीमा औटी, योगेश औटी, बाबासाहेब चेडे, सुनील म्हस्के, सचिन महाराज शेटे, पिंटू गांधी, संदीप पितळे, संतोष घोरपडे आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
श्रीगोंद्यातील भूसंपादनासाठी पन्नास कोटी मंजूर- खा.सुजय विखे


