सोलापूर प्रतिनिधी- शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय जनता पार्टीची मोहोळ तालुक्यात काल राज्य सरकार विरोधात दोन वेगवेगळी आंदोलने पार पडली. त्यापैकी एका गटाने “काहो देवा उशिर लावीयेला। तुमच्यासाठी जीव वेडावला॥” संत जनाबाईच्या या अभंगा प्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या दोन वतीने मोहोळ येथील श्री नागनाथ महाराजांना आर्त साद घालली. तर लाल पागोटे गुलाबी शेला पहिल्यांदा तुम्ही मंदिर खोला अन दर्शनाला चला, तीन आघाड्यांच्या सरकारचा तीव्र निषेध असे म्हणत दुसऱ्या गटाने श्रीदत्त मंदिरात साकडे घातले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंदिरे, धार्मिक स्थळे बंद आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील अनेक दारू दुकाने सुरू केली आहे. मात्र मंदिर व धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत सरकार कोरोनाचे कारण पुढे करीत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे भाविक भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जात आहेत.
राष्ट्रवादीच्या आणखी एका युवा आमदाराला कोरोनाची लागण
त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ शहर व तालुक्यात देखील शनिवारी भाजपच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मात्र गेल्या आठवड्यात पदाधिकारी निवडीवरून मोहोळ तालुका भाजपमध्ये उभी फूट पडली असून दोन गट आमनेसामने उभे राहिले आहेत.
पारनेरमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन
त्यापैकी एका गटाने मोहोळचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या बंद मंदिरासमोर भजन करून घंटानाद आंदोलन केले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटातून अवघ्या जगाला वाचव आणि राज्यातील तिर्थक्षेत्रे, मंदिरे, मस्जिदी आदी धार्मिक स्थळे तात्काळ खुली करण्यासाठी राज्य सरकारला चांगली बुद्धी दे! असे साकडे नागनाथ महाराजांना घालण्यात आले. यावेळी नागनाथ मंदिराचे मुख्य पुजारी राजेंद्र खरगे महाराज, युवा मोर्चा ता. अध्यक्ष अजय कुर्डे, सरचिटणीस रमेश माने, शहराध्यक्ष सुरेश राऊत, महेश चेंडगे, तानाजी दळवे, संजीव खिलारे, प्रदिप लाळे, रामदास झेंडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिशिंगणापूरमध्ये दार उघड उद्धवा दार उघडच्या घोषणांसह भाजपचा घंटानाद
भाजपच्या दुसर्या गटाने नूतन तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ शहरातील दत्त मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केला. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश सोवनी, भाजपचे नेते संतोष पाटील भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष संजय क्षीरसागर, माजी जिल्हा चिटणीस सतीश पाटील, जेष्ठ नेते लक्ष्मण तात्या कृपाळ, श्रीकांत शिवपुजे, मुजूप मुजावर, अमोल चोरगे, कासीम मुल्ला,औदुंबर वाघमोडे, दीपक गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीने या आंदोलनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर वंचित बहुजन आघाडी ने कडाडून टीका केली आहे. “स्वतःला शिस्तबद्ध म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी वेगवेगळी आंदोलने केली. भाजपचे पदाधिकारी ढोंगी असून कोरोना महामारी च्या काळात मंदिरे खुली करण्यासाठी दांभिक आंदोलने करत आहेत.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांनी केली.
तर, “वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करून सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीच खर्या विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे ढोंगी भाजपने श्रेय घेण्यासाठी हे नौटंकी आंदोलन केले आहे.” असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आवारे यांनी केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

