पुणे:- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल वल्लभ बेनके यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे.अशी माहिती त्यांचे बंधू अमित बेनके यांनी दिली.
नारायणगाव येथील व्यापाऱ्याच्या मुलाचा १३ ऑगस्ट रोजी ओसरा हॉटेल येथे विवाह झाला. या विवाहाला आमदार अतुल बेनके यांच्यासह सुमारे तीनशे नागरिक उपस्थित होते. कोरोना बाधीत असलेली वधूची आजी या विवाहाला उपस्थित होती. यामुळे वधू, वर ,वरपिता यांच्यासह २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
पारनेरमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन
आमदार बेनके यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा विवाह आमदार बेनके यांना सुद्धा अडचणीचा ठरला असल्याचे मत व्यक्त होत आहे. आमदार बेनके यांना अंगदुखी, खोकला आदी लक्षणे दिसून आल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
शनिशिंगणापूरमध्ये दार उघड उद्धवा दार उघडच्या घोषणांसह भाजपचा घंटानाद
जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना तालुक्यात लेण्याद्री, ओझर व नारायणगाव येथील कोविड केंद्रात उपचार मिळावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. विधानसभेला आमदार अतुल बेनके यांनी शिवसेनेच्या शरद सोनवणे यांचा पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता.
श्रीगोंद्यातील भूसंपादनासाठी पन्नास कोटी मंजूर- खा.सुजय विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

