मुंबई : मागील काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर करु पाहत आहे. कोरोनाच्या या लाटीत बॉलीवूडचे कलाकार आणि क्रिडाक्षेत्रातील अनेक व्यक्तींना संसर्गाची लागण झाली आहे. रायपुर येथे नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत अनेक माजी क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवीला होता. या स्पर्धेत सर्व खेळाडूंची चांगली काळजी घेण्यात आली तरीही या स्पर्धेतील अनेक खेळाडूना कोरोनाची लागण झाली आहे.
सुरुवातील भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ युसुफ पठान आणि बद्रीनाथ यांना कोरोनाची लागण झाली. आता युसुफ पठान पाठोपाठ त्याचा भाऊ इरफान पठानचीही कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. इरफानने स्वत: ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.
यावेळी इरफान म्हणाला की मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र तरिही कोरोना चाचणी सकारात्मक आली असल्याने मी स्वत:ला होम आयसोलेट करुन घेतले आहे. तेव्हा जे कुणी माझ्य़ा संपर्कात आले असतील त्यांनीही कोरोना चाचणी करुण घ्यावी असा सल्ला इरफानने दिला आहे. दोनच दिवसापुर्वी इरफानचा भाऊ युसुफ पठानची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. दोघे भाऊ नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मध्ये एकत्र खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील’
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शरद पवारांची फोनद्वारे विचारपूस !
- ‘मोदींचा दौरा संपल्यावर धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या, बांगलादेश दौऱ्याचे हे फलित आहे’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

