🕒 1 min read
नागपूर : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करा, अशा आशयाचे निवेदन लहु सेनेच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यासंदर्भात लहू सेनेच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली.
मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचे अ,ब,क,ड वर्गीकरण करून मातंग (मांग व तत्सम पोटजाती) समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण होऊ शकते तसा अधिकार राज्याला आहे.
असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले असून हे प्रकरण मुख्य न्यायमूतीर्ंनी पूर्ण संविधानिक पिठाकडे सोपवून आपल्या मार्गदर्शनाखाली निकाल देण्याची विनंती केली आहे. मातंगच्या (मांग व तत्सम पोटजाती) शैक्षणिक विकासासाठी अण्णाभाऊ संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी. बार्टी या शैक्षणिक संस्थेमधील अधिकारी तसेच समतादूत कर्मचार्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी.
क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग अभ्यासक आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. लोक शाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बंद झाले असून या महामंडळात एक हजार कोटी रुपये देऊन त्वरित सुरू करावे.
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. लहू सेनेचे प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात जावेद पठाण, जीवन गायकवाड, बाल्या खडसे, हर्ष काळे, दीपक गायकवाड, राजेश सोनटक्के, शिवा तायवाडे आदींचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या :-
- कोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार
- बॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले
- पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार
- मोठी बातमी : राऊत-फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला
- …आता रकूल प्रीतची दिल्ली हाय कोर्टाकडे धाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
