मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय भूकंपाच्या घडामोडी सुरु असल्याचे अंदाज वर्तवले जात होते. ऑक्टोबर महिन्यात राजकीय भूकंपाचे भाकीत अनेक नेत्यांनी वर्तवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी असलेली गुपित जवळीक, काँग्रेसशी विरोधी विचारधारा असलेली शिवसेना हे सगळे मुद्दे बघता राजकीय हालचाली महत्वाच्या आहेत.
काल, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घडल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. अनेक राजकीय नेत्यांसह तज्ञांनी वेगवेगळे अंदाज बांधण्यास सुरुवात केली. मात्र, आता या ‘गुप्त’ बैठकीचे कारण खुद्द संजय राऊत यांनी स्पष्ट केले असून, कालची भेट ही गुप्त पासुन पूर्वनियोजित असल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये कमालीची चलबिचल असल्याचे पाहायला मिळत आहे. आता शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. तर या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित आहेत. राऊत-फडणवीसांच्या भेटीनंतर हि तातडीची बैठक होत असल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ज्यावेळी सरकार पडेल तेव्हा बघू…’ फडणवीसांचे सावध वक्तव्य
- हे गंजाडी देशाचे आदर्श असूच शकत नाही – बाबा रामदेव
- कोव्हिड सेंटरमध्ये लज्जास्पद प्रकार, मुलींच्या वसतिगृहाची रुग्णांनीच केली नासधूस; वाचा काय आहे ‘हा’ प्रकार
- बॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले
- पुन्हा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी; ‘या’ निवडणूकीसाठी आमनेसामने येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

