सोलापूर : राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातला आहे. अचानक आलेल्या या रोगाने देशाला आर्थिक फटका तर बसलाच या सोबतच वैद्यकीय कमतरतेमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. उपचारासह कोव्हिडबाधित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी सुरुवातीला शासकीय वसतिगृहाचा कोव्हिड सेंटर म्हणून उपयोग करण्यात आला.
सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाची नासधूस करण्यासोबतच पैसे देखील लुटल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. सोलापुरातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोव्हिड सेंटर घोषित करण्यात आले होते. सोलापूर जिल्हा कारागृहातील संशयित कैद्यांना उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते.
काय आहे या कैद्यांनी केलेला धक्कादायक प्रकार?
राज्यात अचानक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी असेल त्या अवस्थेत आपलं गाव गाठलं होत. या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी आपले महत्वाचे कागदपत्र, पैसे आणि कपडे कपाटातच बंद करून ठेवले होते. येथे उपचारासाठी आलेल्या या कैद्यांनी कपाटाचे कुलूप तोडून कागदपत्र फाडले, पैसे लुटले एवढेच नाही तर त्यांच्या कपड्यांवर खालच्या शब्दातील वाक्ये लिहून नासधूस केली.
हा सर्व संतापजनक प्रकार आता समोर आल्याने अधिकाऱ्यांनी कारागृह पोलीस प्रशासनाकडून माहिती मागवली आहे. यावर आता काय कारवाई होणार हे महत्वाचं असलं तरी कोव्हीड सेंटरमध्ये होणारे हे गैर प्रकार कधी थांबणार? असे सवाल केले जात असून विद्यार्थिनींचे झालेले नुकसान कोण भरणार? असा संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘या’ दिवसापासून चित्रपटगृह उघडण्यास परवानगी
- बॉलिवूडमधील ड्रग्ज घेणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही – आठवले
- रावसाहेब दानवेंनी केला ‘त्या’ भेटीचा खुलासा, म्हणाले…
- सुजय विखेंच्या प्रयत्नांना यश; अळकुटी ते राळेगण रस्त्यासाठी १६ कोटी मंजूर
- मराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा – उदयनराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

