Share

महाराष्ट्राचा बुरगुंडा हरवला, लोककलावंत निरंजन भाकरे यांचे निधन

Published On: 

औरंगाबाद : लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची मने जिकणारे प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचे निधन झाले आहे. ‘बुरगुंडा’ या भारुडाने त्यांनी देशच नाही तर विदेशातही कार्यक्रम गाजवले होते. अनेक वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

निरंजन भाकरे यांचा जन्म १० जून १९६५ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे झाला होता. भाकरे यांनी लोककला आणि भारुडांच्या माध्यमातुन अख्ख्या महाराष्ट्राची मने जिंकली होती. सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, दम दमा दम, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, धिना धिन धा, तसेच झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे, अवघा रंग एक झाला, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र माझा अशा अनेक कार्यक्रमांत त्यांनी रसिकांच्या मनात घर केले होते.

भाकरे यांनी सपत्निक देहदानाचा संकल्प केला होता. राज्य सरकारच्या वतीने सर्व सामान्यांसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून केले. लोककला जीवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मोठे आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!