नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा इंटरनेटच्या दुनियेत सतत सक्रिय असतात. जेव्हा तो सोशल मीडियावर काहीतरी हटके पाहायला मिळते. तेव्हा आनंद महिंद्रा ते शेअर करतात. अनेकांना ते पुढे येत मदत देखील करतात. हे अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरते. दरम्यान, आज पुन्हा आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी १२ तारखेला गुरसौरभ नामक व्यक्तिचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये गुरसौरभने बनवलेल्या डिव्हाइसची माहिती देतो. यासोबत आनंद महिंद्रा यांनी लिहले की, “जगात मोटरसायकलसारखी सायकल बनवण्याची अनेक उपकरणे आहेत, परंतु यांच्या छोट्या डिझाइनमध्ये चिखलात काम करण्याची आणि फोन चार्ज करण्याची क्षमता आहे. हे विशेष आहे.”
पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “हा व्यवसाय नफा देईल की नाही, पण त्यात गुंतवणूक करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यासोबतच त्यांनी सोशल मीडियाच्या लोकांना आवाहन करून गुरसौरभ यांच्याशी कोणीतरी संपर्क साधावा”, असे सांगितले.
This has been doing the #Signal rounds the last few days. Not the first device in the world to motorise a cycle. But this is a) An outstanding design—compact & efficient b) Rugged-loved the working in mud, making it an off-roader! c) Safe d) Savvy—a phone charging port! (1/3) pic.twitter.com/Fb4gwBd8FS
— anand mahindra (@anandmahindra) February 12, 2022
यासोबतच या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, २० मिनिटे पॅडलिंग केल्यानंतर या स्वदेशी सायकलची बॅटरी ५० टक्के चार्ज होते. हे उपकरण सायकलला जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रति तास वेगाने नेऊ शकते. त्याच वेळी, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर, ते ४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते आणि १७० किलोपर्यंत वजन उचलू आणि खेचू शकते. हे उपकरण खूप मजबूत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आग, पाणी आणि चिखल यांचाही त्यावर विशेष परिणाम होत नाही.
गुरसौरभचे हे उपकरण कोणत्याही सामान्य सायकलचे इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतर करते. यासाठी सायकलमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. कारण हे उपकरण सायकलच्या पॅडलला जोडते, त्यानंतर तुम्ही सायकल सुंदरपणे चालवू शकता. आनंद महिंद्रा यांनी गुरसौरभच्या सायकल उपकरणात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे लवकरच भत्ता वाढवणार
- निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर जुमला ??, चीनच्या ५४ अॅपवर भारत सरकारची बंदी
- एक राजा एक जयंती; शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याची विनोद पाटलांची विनंती
- बुलडाण्यात वाईन विक्री विरोधात भाजपच्या महिला आक्रमक
- काँग्रेस नेत्याची भाजप आणि नितीन गडकरींवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले…

