जालना: जिल्ह्यात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. बुधवारी पहाटे सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू आढळून आली. सदर बाजार पोलिसांनी केेलेल्या या कारवाईत देशी दारूसह कार, असा एकूण पाच लाख २० हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेक्र द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंद ठेवण्याचे शासनाने निर्देश आहेत.
असे असतानाही काहीजण चोरी छुपे आपले व्यवसाय सुरू ठेवत असून, अवैध वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत रात्रीला नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिले आहेत. सदर बाजार पोलिसांचे पथक बुधवारीमध्यरात्री दोनच्या सुमारास मंठा चौफुली येथे नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना एक कार संशयितरित्या जाताना दिसली. पोलिसांची कार थांबवून तपासणी केली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आली.
पोलिसांनी कार चालक संतोष सुभाष जैस्वाल यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, संशयित किशोर मांगिलाल जैस्वाल व अशोक रामनारायण जैस्वाल यांच्या सांगण्यावरून राजूर येथील किशोर जैस्वाल याच्या हॉटेलवर सदर दारू घेऊन जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी देशी दारूसह कार असा एकूण पाच लाख २० हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित कारचालकासह अन्य दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं – नायडू
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

