Share

कोहलीच्या निर्णयावर भडकले गावसकर म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पहिला कसोटी सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहसह  शाहबाज नदीमऐवजी अक्षर पटेल, जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप यादवला संधी दिली आहे. पण भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी टीमच्या या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बुमराहचा कामाचा ताण बघता त्याला विश्रांती देण्यात आल्याचं विराटने टॉसवेळी सांगितलं. पण गावसकर यांना मात्र हे पटलेलं नाही. क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर एकचा बॉलर आहे. आतापर्यंत 18 टेस्टमध्ये बुमराहने 83 विकेट घेतल्या आहेत.

‘वर्कलोडच्या नावावर तुम्ही तुमच्या नंबर एक बॉलरला आराम देऊ शकत नाही. बुमराह नव्या बॉलसोबत भारताचा नंबर एक बॉलर आहे, तर अश्विन नंबर एक स्पिनर आहे. महत्त्वाच्या सीरिजची पहिली मॅच तुम्ही हरलेला आहात, त्यामुळे तुम्ही तुमच्या नंबर एक फास्ट बॉलरला आराम देऊ शकत नाही. बुमराहबाबतच्या निर्णयाबाबत मला आश्चर्य वाटलं, कारण दुसऱ्या टेस्टनंतर 7 दिवसांचा वेळ आहे,’ असं गावसकर म्हणाले.

भारतीय टीम :

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!