नवी दिल्ली – कौटुंबिक पेन्शनसंदर्भात दूरगामी सुधारणा करत या पेन्शनच्या प्रती महिना कमाल मर्यादेत 45,000 वरून 1,25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
माता-पित्याच्या मृत्युनंतर अपत्य, दोन कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असेल तर स्वीकारार्ह रकमेबाबत निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने स्पष्टीकरण जारी केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचे जीवनमान सुलभ होण्याबरोबरच त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे.
दोन्ही कौटुंबिक पेन्शनची रक्कम आता 1,25,000 रुपये प्रती महिना पर्यंत मर्यादित करण्यात आली असून आधीच्या मर्यादेच्या अडीच पटीपेक्षा ही रक्कम जास्त आहे. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातल्या सदस्यांना हा निर्णय झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1972 च्या नियम 54 च्या उपनियम (11) नुसार पती आणि पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील आणि या कायद्याच्या तरतुदी त्यांना लागू असतील तर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे जीवित अपत्य दोन कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र राहील.
महत्वाच्या बातम्या
- महिलाच्या सन्मानाच्या गप्पा मारणारे पुरोगामी पुढारी पूजा चव्हाण प्रकरणात गप्प का ?
- बॉलिवूडचा शहेनशहा शरद पवारांना भेटण्यासाठी थेट बारामतीत?
- खाम नदीसाठी छावणीच्या सीईओंचा पुढाकार
- ‘राज्यपालांचे करायचे काय ?’; ‘तीच तुमची खरी अडचण आहे’
- कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण….


