Share

लसींच्या तुटवड्यामुळे औरंगाबादेत आजपासून पहिला डोस रद्द! आता दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य…

Published On: 

औरंगाबाद : १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. त्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये जेष्ठ नागरिक, ४५ प्लस नागरिकांना लस देण्यात आली. मात्र सुरुवातीला लसीबाबत जनजागृती नसल्याने लस घेणाऱ्यांचे प्रमाण नगण्य होते. मात्र जसजशी लसीबाबत जनजागृती होत गेली तसतशी नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मनपाने तर जम्बो लसीकरण मोहिमच हाती घेतली, १८ प्लस लसीकरणही १ मे पासून सुरू झाले होते. मात्र आता लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसात लसीकरणात अनेक अडचणी येत आहेत. आजपासून (दि.१२) तर केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच लस मिळणार आहे.

शासनाच्या नुकत्याच आलेल्या निर्देशांनुसार आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी प्रथम डोसचे लसीकरण स्थगित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोमवारी आरोग्य विभागाच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी देण्यात येत असलेल्या लसीकरणाचा पहिला डोस लसींची उपलब्धता कमी असल्यामुळे तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर नागरिकांना देखील पहिला डोस तूर्त मिळणार नाही.

ज्या नागरिकांनी यापूर्वी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे व त्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशा नागरिकांना आजपासून सर्व लसीकरण केंद्रावर दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी गर्दी करू नये. असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले. औरंगाबादेत आत्तापर्यंत २ लाख ६० हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून १४ हजार नागरिक दुसऱ्या डोस द्यावा प्रतिक्षेत आहेत. तसेच १८ ते ४४ वयोगटातील ५ हजार नागरिकांचे लसीकरण आत्तापर्यंत झाले आहे.

पुढील आदेश येईपर्यंत पहिला डोस स्थगित : मंगळवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शासनाच्या आदेशानुसार आजपासून केवळ दुसरा डोस असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. कारण लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाचे पुढचे आदेश येईपर्यंत १८ ते ४४, ४५ प्लस लसीकरणाचा पहिला डोस स्थगित करण्यात आला आहे. अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!