🕒 1 min read
जालना: शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे, शहरातील गांधी नगर भागांमध्ये रात्री आठच्या सुमारास मित्राने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या मित्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरील घटनेने परिसरामध्ये खळबळ माजली आहे. संतोष शिवलाल वाघाडे, असे आरोपीचे नाव असून त्याने मित्र श्याम गणपत थोरवे याच्या पोटामध्ये चाकूचे वार केले, यामध्ये श्यामचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन दोघांचे भांडण झाले होते. परंतु संतोषने रागाच्या भरातून चाकू काढला असता श्याम घाबरला, त्यावेळी त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. या भांडणातून मंगळवारी वाघाडे याने श्यामवर चाकूने हल्ला केला. श्यामच्या मावस भावाने त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी ही भेट दिली. श्याम गणपत थोरवे यांचा मावस भाऊ अमोल देविदास पवार ज्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत आहे तर दुसरीकडे शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी असे नागरिकांचे मत आहे तसेच या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. असून पुढील तपास चालू आहे. आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती उप विभागिय पोलिस आधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मृतदेह नदीत फेकले जातात, कुत्रे मृतदेहांचे लचके तोडतात अन् योगीजी ऑल इज वेल म्हणतात’
- पंढरपूर-मंगळवेढ्याचे नवनिर्वाचित आमदार समाधान अवताडेंनी घेतली आमदारकीची शपथ
- पोलिसांचे दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये, पोलिस बॉईज संघटनेची मागणी
- महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार की सूट मिळणार ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
- भाजपच्या अतुल भातखळकरांकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या संवादाची नक्कल!


