Share

पैठणमध्ये कापड व्यावसायीकांवर कारवाई, नियमांचा भंग करणारे मद्यविक्रेते मात्र मोकाट?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरात मद्यविक्रेत्यांकडून आपत्ती व्यावस्थापन समितीने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असतांना त्यांच्यावर कारवाई नसून, कापड व्यवसायीकांवर मात्र घरात कपडे विकले म्हणुन मोठी दंडात्मक कारवाई होत असल्याने व्यापा-यात असंतोष पसरला आहे. त्यामुळे मद्य विक्रेते आणि प्रशासनाचे साटे-लोटे असल्याचा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.

महसुल, नगर परिषद व पोलिस प्रशासानने शहरातील काही कापड व्यवसायीकांच्या घरावर छापा मारत दोन व्यापा-यांवर प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावत आपत्ती व्यावस्थापन कायद्यान्वये कारवाई करुन दुकान गोडावून सिल केले आहे. अशाच पध्दतीने शासनाने मद्य विक्रेत्यांना केवळ घरपोच मद्य विक्रीची परवानगी दिलेली असतांना शहरातील मद्यविक्रेते घरपोच न करता उघडपणे परमीटरुममधुन दारु पार्सल विकुन जिल्हाधिकारी यांनी घालुन दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत आहे. ईतके असतांना उत्पादन शुल्क विभाग याकडे जानुन-बुजुन दुर्लक्ष करीत आहे.

या बाबत काही कापड व्यापा-यांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रीया व्यक्त करतांना दारुविक्रीला परवानगी आहे, मग कापड विक्रीला का नाही? असा प्रश्न उपस्थित करत दारु विक्रेत्यांकडून नियमांचे भंग होत असतांना कारवाई होत नाही, मात्र आम्ही ईद निमित्त तथा घरगुती लग्णासाठी घरात बसुन कपडे विकले तर दंडात्मक कारवाई होते, हा कुठला नियम? असा नाराजीचा सुर व्यवसायीकांतुन निघत आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी गैरकारभारावर कारवाई करीत नसतील तर या प्रकरणी स्थानिक प्रशासना मार्फत कारवाई केली जाईल. असे तहसिलदार चंद्रकांत शेळके म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!