मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. आता, भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना काहीही कळत नाही, ते फक्त चहा पिण्यासाठी राज्यपालांकडे गेले होते, असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे.
‘संध्याकाळी ५ वाजता चहाची वेळअसते. मुख्यमंत्री चहासाठी राज्यपालांकडे गेले होते. इतरांनाही सोबत चला असं म्हणाले. मुख्यमंत्र्यांना काहीही कळत नाही. ते काही वाचतही नाहीत,’ असा प्रहार राणेंनी केला आहे. यासोबतच, ‘ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते. मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. त्यांना आपले मंत्रिपद टिकवण्यात रस आहे. सरकारच्या ओठात एक आणि पोटात एक आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे हे या सरकारच्या मनात नाही,’ असा आरोप देखील नारायण राणेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गावागावांतील सौरऊर्जावरील पथदिवे निघाले भंगारात, प्रशासनाची उदासीनता आली समोर
- ‘काँग्रेसने देश निर्माण केलाय आणि मोदी आता स्वतःच घर उभं करतायत !’
- भाजपच्या अतुल भातखळकरांकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या संवादाची नक्कल!
- ‘मृतदेह नदीत फेकले जातात, कुत्रे मृतदेहांचे लचके तोडतात अन् योगीजी ऑल इज वेल म्हणतात’
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

