मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे महिला हॉकी संघाचे पहिलेवहिले हॉकी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहीले. उपांत्य फेरीच्या या सामन्यात अर्जेटिनाने भारताचा २-१ असा पराभव केला.
या सामन्यातील पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू वंदना कटारीयाच्या घरासमोर काही विक्षीप्त तरुणांनी फटाके फोडले. हरिद्वारनजीक वंदनाचे गाव आहे. अर्जेटिनाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर तिच्या घराजवळ फटाके फोडण्यात आले. या प्रकारावर वदंनाचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या या आक्षेपाला पाठींबा दर्शवला आहे.
या प्रकरणात स्थानीक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर स्थानीक पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहे. या तरुणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंदनाच्या कुटुंबायानी केली आहे. यापुर्वी पोलीस महिला संघाने अविश्वसनीय कामगीरी करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. सुवर्णपदक हुकल्यानंतर आता भारतीय संघ कांस्यपदकासाठी लढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऐतिहासिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन
- केकेआरसाठी आनंदाची बातमी ; ‘हा’ स्टार खेळाडू उर्वरीत आयपीएलसाठी उपलब्ध
- ‘शरद पवारांशिवाय संसद ओसाड वाटते’-लालू प्रसाद यादव
- कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजापुढे इंग्लंडचे लोटांगण
- ‘इच्छा माझी पुरी करा’ ; पतीच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठूरायाला पत्नीकडून 1 कोटींचे दान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

