Share

कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजापुढे इंग्लंडचे लोटांगण

Published On: 

मुंबई : भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याला बुधवारी ४ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या संघाने अक्षरश: गुडघे टेकले. भारतीय वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर अटोपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या बीनबाद २१ धावा झाल्या होत्या.

नॉटींगहम येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजानी इंग्लंडचा हा निर्णय चुकीचा ठरवला. पहिल्याच षटकात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमाराहने सलामीवीर रॉरी बर्न्सला भोपळा न फोडता बाद झाला. यानंतर इंग्लंडचा कोणताही फलंदाज भारतीय गोलंदाजासमोर टिकु शकला नाही. अवघ्या १८३ धावांवर इंग्लंचा संपुर्ण संघ बाद झाला.

इंग्लंडच्या डावात कर्णधार जो रुटने १०८ चेंडुचा सामना करताना ११ चौकारासह सर्वाधीक ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त डॉमीनीक सिब्ली(१८), झॅक क्रॉली(२७), जॉनी बेअरस्टो(२९) आणि सॅम करण(२७) हे फलंदाज वगळता इतर फलंदाज दुहेरी आकडा ओलांडु शकले नाही. भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधीक ४ गडी बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल प्रत्येकी ९-९ धावांवर खेळत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!