नवी दिल्ली: राजदचे नेते लालू प्रसाद यादव सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी यावेळी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली. त्याअगोदर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केले. तर शरद पवारांच्या भेटीमागील कारणही स्पष्ट केले.
शरद पवार यांची प्रकृती बरी नव्हती. मी त्यांना भेटण्यासाठी आणि आरोग्याची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. शरद पवारांशिवाय संसद ओसाड वाटत आहे. मी, शरद पवार आणि मुलायम सिंह यादव असे आम्ही तिघे खुप वर्ष वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी राजकीय लढे दिले आहेत. काल मी मुलायम सिंह यादव यांचीही भेट घेतली, असे विधान लालू प्रसाद यादव यांनी केले आहे.
दरम्यान लोजपामध्ये झालेल्या बंडाळीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, “लोक जनशक्ती पार्टीमध्ये जे काही घडलं, त्यानंतरही मला असं वाटतं की, चिराग पासवान हेच लोजपाचे नेते आहेत” तसेच चिराग पासवान-तेजस्वी यादव एकत्र येण्याची खात्रीही त्यांनी व्यक्त केली. तर शरद पवार आणि लालू प्रसाद यादव यांच्या भेटीने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान फुटते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजापुढे इंग्लंडचे लोटांगण
- ‘इच्छा माझी पुरी करा’ ; पतीच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठूरायाला पत्नीकडून 1 कोटींचे दान
- १०२ व्या घटनेची केंद्राने केली दुरुस्ती; आता चव्हाण म्हणतात, मराठा आरक्षणासाठी ‘हे’ देखील करा
- शिवाजीनगर भुयारी मार्ग : खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट
- शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करा, आ.चव्हाण यांनी घेतली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

