Share

ऐतिहासिक! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन

Published On: 

नवी दिल्ली : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी इतिहास घडवला आहे. कांस्यपदकाच्या लढाईत भारताने जर्मनीचा पराभव करत पदक पटकावले आहे. या सामन्यात भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ असा पराभव करत तब्बल 41  वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावले आहे.

भारतीय हॉकीच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपुर्ण देशातून हॉकी टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कांस्यपदक पटकवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुरुष हॉकी टीमचे अभिनंदन केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय हॉकी संघाचे कौतुक करत म्हणाले, ‘ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. भारताला हॉकी संघाचा अभिमान आहे. अशा शब्दात मोदींनी कौतुक केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरुष हॉकी संघाचे कौतुक करत म्हणाले, ’41 वर्षानंतर हॉकीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. संघाने अपवादात्मक कौशल्ये, लवचिकता आणि जिंकण्याची जिद्द दाखवली. या ऐतिहासिक विजयामुळे हॉकीमध्ये एक नवीन पर्व सुरू होईल तसेच तरुणांना प्रेरणा मिळेल.’

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!