मुंबई- चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांची बुधवारी सकाळपासून इनकम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरु आहे.या चौकशीदरम्यान या दोघांशी संबंधीत ऑफिसेस आणि मालमत्तांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापे टाकण्यात आलेत. मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे.
मुंबईतील फँटम फिल्म व क्वाण टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यालयावर मारण्यात आलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्र व डिजीटल डेटा आयकर विभागाला हस्तगत झाला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत फँटम फिल्मकडून निर्मित करण्यात आलेल्या चित्रपटांचे बॉक्स कलेक्शन हे अधिक दाखवण्यात आलेले असून त्याच्या संदर्भात करण्यात आलेला कर चुकवण्यात आल्याचे म्हटले आहे.
अनुराग कश्यप सोबतच निर्माता विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना यांच्यावरही कारवाई सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधींच्या घोळ असल्याचं समोर आलं आहे.अभिनेत्री तापसी पन्नूने पाच कोटींची रोख रक्कम घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. आता याचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अनुरागच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना ३०० कोटी रुपयांचा हिशेब देता आलेला नाही. चित्रपट दिग्दर्शक आणि भागिदारांमध्ये प्रोडक्शन हाउसमधील व्यवहारात मोठी प्रमाणात हेराफेरी आहे. कमी मूल्यांकनाशी संबंधित जवळपास ३५० कोटींचा निधीचे पुरावे मिळाले आहेत. सर्च ऑपरेशन दरम्यान इनकम आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. याशिवाय 20 कोटींच्या टॅक्सचोरीसंबंधी पुरावे मिळाले आहेत.यासंबंधी पुढीत तपास सुरू आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान,ज्याअर्थी इन्कम टॅक्सने धाडी घातल्या, त्याअर्थी कुठे तरी गडबड आहेच, पण धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? ‘बॉलीवूड’मध्ये रोजच्या रोज होणारी कोटीच्या कोटी उड्डाणे गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात काय? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी
- कोरोना लसीचा डोस घेतल्यावर मोदींचे परदेश दौरे झाले सुरु; ‘या’ देशाचा करणार दौरा
- ‘आता संजय राठोडला अटक करायला किती दिवस लावणार ?’
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन

