आटपाडी : मागील अनेक महिन्यापासून कोरोनामुळे सगळे व्यवहार ठप्प होते. तसेच जनावराचे बाजार देखील बंद होते. मात्र आता हळूहळू बाजार सर्वत्र भरत आहेत. सांगलीच्या आटपाडीतील जनावरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे.
त्याच आडपाडीत काही दिवसांपूर्वी १६ लाख रुपयांचा बकरा चोरीला गेला होता. त्यानंतर त्या बारकऱ्याच्या मालकाने पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत याचा शोध लावला आणि १६ लाख रुपयांचा बकरा शोधून काढला आणि चोरी केलेल्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
आडपाडीत सोमनाथ जाधव यांचा १६ लाख रुपयांचा बकरा अखेर सापडला. बकऱ्याची चोरी करणारे तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा बकराही पोलिसांनी हस्तगत केला.आटपाडी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नायक अमोल कराळे, रामचंद्र खाडे, नितीन मोरे, प्रमोद रोडे यांनी तात्काळ तपास करत आरोपींना जेरबंद केले.बकरा आणि त्याची चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळानी आटपाडी पोलिसांचा गौरव केला. गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूक काढली.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझं नाव संजय राऊत आहे, उखडा जे उखडायचं ते’
- क्या दाल मे कुछ काला है ? राम कदमांनी काढला संजय राऊत यांना चिमटा
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- ‘कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय’
- परदेश दौऱ्यावर असल्याने राहुल गांधी राहणार काँग्रेसच्या स्थापना दिनाला गैरहजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
