Share

अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि सुभाष देसाई उपस्थित राहिले होते. आज संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा पार पडला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महापौर निवासाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रांगणामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात चित्रफितीच्या माध्यमातून स्मारकाविषयी सादरीकरण करण्यात आले.

बाळासाहेबांचं स्मारकाचं काम होणार दोन टप्प्यात –

पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी कामे केली जातील. यासाठी २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

तर, दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामं केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. ही कामे स्मारकाची इमारत अंतिम टप्प्यात आल्यानंतर केली जातील. या कामांसाठी १५० कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!