Share

आखेर पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर सूर्यकुमार यादवने सोडले मौन

Published On: 

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडच्या संघाचा ८ धावांनी पराभव केला. आणि आपले मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. हा सामना विशेष गाजला ते या सामन्यातील खेळाडूंच्या प्रदर्शनापेक्षा पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे. याच सामन्यातील सामनावीर सुर्यकुमार यादव हा पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे बाद झाला होता.

सुर्यकुमार ५७ धांवावर खेळत असताना इंग्लंडच्या डेव्हिड मलानने सुर्यकुमारचा झेल पकडला आणि सुर्यकुमार यादवला तंबुत माघारी पाठवले. मात्र रीप्लेमध्ये मलानने जेव्हा झेल पक़डला होता त्यावेळी चेंडुचा स्पर्श जमिनीला झाला असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तरीही सुर्यकुमारला बाद देण्यात आले. त्यामुळे हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. यानंतर पंचाना त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे सोशल मीडीयावर चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.

या निर्णयावर सुर्यकुमारने मौन सोडत म्हणले आहे की, मी जसा बाद झालो मी निराश मुळीच झालेलो नाही. काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. हातमध्ये असलेल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कटिबद्ध राहावे लागते. मात्र तो निर्णय माझ्या हातात नव्हता. गुरुवारी झालेल्या सामन्यात सुर्यकुमारला पहिल्यांदा फलदांजी करायला उतरला आणि त्याने शानदार अर्धशतक झळकावले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!