Share

अखेर पूजा चव्हाण प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडमध्ये; दोन युवकांना घेतलं ताब्यात !

Published On: 

पुणे : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.

यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे पुण्यात दाखल झाले होते. यामुळे या प्रकरणात तपासाला वेग आल्याचे काल दिवसभरात दिसून येत होते. आता, पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक जण हा अरुण राठोडचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. अरुण राठोड हा तरुण गायब आहे. त्याच्या जवळील तरुणांना ताब्यात घेतल्यामुळे महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!