Share

अखेर किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल; महिलांसह कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

Published On: 

कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना २० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं. तर अखेर आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.

मागील वेळी त्यांनी जेव्हा कोल्हापूरला यायचा प्रयत्न होता तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तीव्र इशारा दिला होता. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सोमय्या यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाबंदी घातली होती. तर सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोल्हापूरला जाण्याची घोषणा केल्यानंतर मुश्रीफ यांनी त्यांना येऊ द्या, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं.

काही वेळापूर्वीच सोमय्या हे कोल्हापुरात दाखल झाले असून शेकडो कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात महिला देखील त्यांच्या स्वागतासाठी आल्या आहेत. करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर सोमय्या हे मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजत आहेत. मुरगूड हे मुश्रीफ यांच्या मतदारसंघात येत असल्याने तिथे काही संघर्ष होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. यासोबतच, मुश्रीफ यांचे आणखी दोन घोटाळे उघड करणार असा दावा देखील सोमय्या यांनी केला असल्याने राजकीय वर्तुळाचा त्यांच्याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!