Share

अखेर ठरलं! अर्जुन कपूर – मलायका अरोरा लवकरच बांधणार लग्नगाठ

Published On: 

🕒 1 min read

 

मुंबई :  बॉलीवूडमधील सर्वांची आवडती जोडी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना कैफ-विकी कौशल, आलिया भट्ट-रणबीर कपूर या जोडप्यांच्या लग्नानंतर आता बॉलीवूडमधील अर्जुन-मलायका हे जोडपं देखील लग्न करण्यासाठी सज्ज झालं आहे. अर्जुन आणि मलायका हे अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. चार वर्ष झाले एकमेकांना डेट करत आहेत.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन आणि मलायका यांनी लग्नासाठी नोव्हेंबर-डिसेंबर हा थंडीचा काळ निवडला आहे. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. या दोघांचे लग्न मुंबई मध्ये होणार आहे. मलायका अरोरा अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहे.

अर्जुन आणि मलायका या दोघांची खास जवळची मैत्रीण करीना कपूर लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये सहभागी असणार, यात काहीच शंका नाही. अर्जुन आणि मलायका या दोघांमध्ये १२ वर्षांचा फरक आहे. अर्जुन मलायका पेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. एका मुलाखतीमध्ये अर्जुन म्हणाला की, आमच्या रिलेशनशिपच्या अंतरावरून आमच्यावर विनाकारण टीका केली जात होती. अशावेळी मलायका माझ्यामागे खंबीरपणे उभी राहिली, असं अर्जुन कपूर म्हणाला.

अर्जुन आणि मलायका एकदम साध्या पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नानंतर ते एका मोठया पार्टीचे आयोजन करणार आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील मित्रमंडळींना आमंत्रित करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!