मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्ष वगळता परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशासह अन्य काही राज्यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, युजीसीने अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत काल (दि.२८ ऑगस्ट) रोजी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय जाहीर केला. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळे आधीच भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असतानाच विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज नेत्यांची पुढील आठवड्यात महत्वाची बैठक!
परीक्षा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आता विद्यापीठांमध्ये हालचाली सुरु करण्यात आल्या असून राज्य सरकार, युजीसी व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संगनमताने परीक्षांचा कालावधी, प्रकार व इतर सर्व बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सद्या चिंतेचे वातावरण असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला आहे.
कोरोनाने ‘या’ काँग्रेस खासदाराचं निधन, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींनी व्यक्त केलं दुःख
मंत्री उदय सामंत यांनी नियोजन आखणीसाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक आयोजित केली आहे, याची माहिती त्यांनी ट्वीटद्वारे दिली. “मा. न्यायालयाच्या निकालाचा आदर करत आज दुपारी दीड वाजता 13 विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच तज्ञांशी चर्चा करू. कोविड च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपू.. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही मानसिक दडपण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करू.” असे त्यांनी स्पष्ट केले.
#व्यक्तिविशेष : यॉर्कर किंग मलिंगा
मा. न्यायालयाच्या निकालाचा आदर करत आज दुपारी दीड वाजता 13 विद्यापीठाच्या कुलगुरूंन सोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच तज्ञांशी चर्चा करू. कोविड च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपू.. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही मानसिक दडपण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करू.
— Uday Samant (@samant_uday) August 29, 2020
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचे तसेच गेले अनेक महिने संभ्रमामुळे ज्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले त्याचे खापर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीवर फोडले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

