🕒 1 min read
दिग्विजय दीक्षित, पुणे :१ जुलै २००७ रोजी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर केवळ १९ वर्षाच्या या खेळाडूने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरवात केली. पहिल्याच सामन्यात लेहमन, गिलख्रिस्त सारख्या मोठमोठ्या खेळाडूंना बाद करत ६ बळी घेऊन हा खेळाडू सर्वांच्या नजरेत आला. त्याच्या अप्रतिम खेळाबरोबरच त्याची चेंडू फेकण्याची अपारंपरिक ऍक्शन आणि त्याची केशरचना या दोन गोष्टीसुद्धा क्रिकेटप्रेमींसाठी कुतूहल होत्या.
२००७ साली झालेल्या विश्वचषकात त्याने भीमपराक्रम करत म्हणजे सलग ४ चेंडूत ४ विकेट्स घेणे. या सामन्यात त्याने दक्षिण अफ्रिकेच्या पॉलॉक, अँड्र्यू हॉल, जॅक कॅलिस आणि अँटीनी यांना बाद करत अफ्रिकेचा हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतो की काय अशी परिस्थिती आणली. आंतरराष्ट्रीय सामन्यात हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. यानंतर २०११ सालच्या विश्वचषकात त्याने केनिया विरुद्ध हॅटट्रिक घेऊन विश्वचषकात २ वेळा हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज हा विक्रम साध्य केला.
मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपाचे आज ‘दार उघड उद्धवा दार उघड’ घंटानाद आंदोलन
१९९६ साली विश्वचषक जिंकून श्रीलंकेने जो दबदबा निर्माण केला होता तसाच दबदबा पुन्हा निर्माण करण्यात संगक्कारा आणि जयवर्धने सारख्या खेळाडूंच्या बरोबरीने मलिंगाचा सुद्धा मोठा वाटा होता. २ वेळा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हुलकावणी खाल्लेल्या श्रीलंकेच्या संघाने २०१४ साली याच मलिंगाच्या नेतृत्वात T-२० विश्वचषक पटकावला.
तुकाराम मुंढेंच्या विरोधातील न्यायालयीन याचिका मागे घेणार का महापौर…?
अंतिम षटकात जेव्हा कमीत कमी धावा देण्याची गरज असते तेव्हा या खेळाडूने वारंवार यॉर्कर गोलंदाजी करत ‘यॉर्कर किंग’ हे विशेषण प्राप्त केले. आपल्या चेंडू फेकण्याच्या शैलीने ‘स्लिंगा’ अर्थात ‘गोफण फेकण्याच्या शैलीत गोलंदाजी करणारा’ हे विशेषण सुद्धा प्राप्त केले.
चंद्रपुरात ‘या’ टोळीचा उच्छाद… राज ठाकरे करणार वडेट्टीवारांना फोन
आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बरोबरच ‘Indian Premier League’ या जगविख्यात शृंखलेत ‘मुंबई इंडियन्स’ या संघाकडून सुरवातीपासून खेळताना त्याने ४ IPL चषक, २ चॅम्पियन्स लीग चषक मिळवताना सिंहाचा वाटा उचलला आणि प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. अगदी मागील वर्षी झालेल्या २०१९ च्या अंतिम सामन्यात सुद्धा शेवटचे षटक टाकताना त्याने यॉर्कर गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना त्याने तो रोमहर्षक सामना केवळ १ धावेने जिंकून दिला.
अशा अपारंपरिक ऍक्शन, विचित्र केशरचना असलेल्या आणि आपल्या जबरदस्त गोलंदाजीने फलंदाजांचे धाबे दणादणवणाऱ्या या खेळाडूस पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा…..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
