Share

कोरोनाने ‘या’ काँग्रेस खासदाराचं निधन, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींनी व्यक्त केलं दुःख

Published On: 

कन्याकुमारी : गेले ५ महिने कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. सामान्य नागरिक, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार ते बॉलिवूड स्टार्ससह सर्वांनाच कोरोनाने विळखा घातल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी रात्री (दि. २८ ऑगस्ट) रोजी काँग्रेसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंत कुमार यांचं कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झालं आहे.

त्यांच्यावर १० ऑगस्टपासून चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.  वसंत कुमार हे याआधी दोन वेळा आमदार होते, तर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुक लढवत ते पहिल्यांदाच खासदार झाले.

#व्यक्तिविशेष : यॉर्कर किंग मलिंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “लोकसभा सदस्य खासदास एच. वसंतकुमार यांच्या निधनाने दुःख झालं. त्यांचे व्यवसाय आणि सामाजिक कामातील प्रयत्न हे नोंद घेण्यासारखे आहेत. मी त्यांच्याशी ज्या ज्या वेळी भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तामिळनाडूच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न पाहिले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती सहवेदना. ओम शांती.” असे ट्विट करत दुःख व्यक्त केले.

मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपाचे आज ‘दार उघड उद्धवा दार उघड’ घंटानाद आंदोलन

राहुल गांधी यांनी देखील ट्विटद्वारे शोक व्यक्त केले आहे. “काँग्रसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचं कोव्हिड 19 मुळे झालेलं निधन खूप धक्कादायक आहे. त्यांची लोकांची सेवा करण्याच्या काँग्रेसच्या विचारांशी निष्ठा नेहमीच मनात घर करुन राहिल. त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्नेहींसोबत सहवेदना.” असे ट्विट त्यांनी केले.

तुकाराम मुंढेंच्या विरोधातील न्यायालयीन याचिका मागे घेणार का महापौर…?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!