नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली धुसफूस काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे सोनिया गांधी यांच्या हाती देण्यात आली, तर येत्या काही महिन्यांत सोन्या गांधींच्या हंगामी पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता.
सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी कार्यसमितीच्या झालेल्या वादळी बैठकीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मात्र, यावेळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.
कोरोनाने ‘या’ काँग्रेस खासदाराचं निधन, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींनी व्यक्त केलं दुःख
काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली असून त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीमध्ये घेण्यात आले आहे. परंतु या समितीमध्ये राहुल गांधी समर्थकांचाच समावेश असल्याने काँग्रेस पक्ष बळकटीसाठी गांधी घराणे वगळता अध्यक्षपद इतर व्यक्तीला द्यावे अशी भूमिका असलेल्या या नाराज नेत्यांमध्ये भर पडली आहे.
#व्यक्तिविशेष : यॉर्कर किंग मलिंगा
आता, पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी हे नाराज नेते नवी रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत. यासाठीच पुढील पावले निश्चित करण्यासाठी एक बैठक होणार असल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.
पत्राद्वारे नाराजी व्यक्त करणाऱ्या २३ काँग्रेस नेत्यांमध्ये कोण कोण?
काँग्रेस कार्यकारिणी सदस्य : गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, जितीन प्रसाद. माजी मुख्यमंत्री : पृथ्वीराज चव्हाण, राजिंदर कौर, वीरप्पा मोईली, भूपिंदरसिंह हुड्डा, राजिंदरकौर भट्टल. राज्यसभा खासदार : कपिल सिब्बल, अखिलेश प्रसाद सिंह, विवेक तनखा.
मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपाचे आज ‘दार उघड उद्धवा दार उघड’ घंटानाद आंदोलन
लोकसभेचे खासदार : मनीष तिवारी, शशी थरूर.माजी मंत्री: पी.जे.कुरियन, रेणुका चौधरी, मंत्र्यांचे सुपुत्र: संदीप दीक्षित, मिलिंद देवरा, अजय सिंह यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष : राज बब्बर(उत्तर प्रदेश), अरविंदर सिंग लव्हली(दिल्ली), कौल सिंग ठाकूर (हिमाचल प्रदेश) , हरयाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष कुलदीप शर्मा तसेच दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री आदींचा समावेश आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

