मुंबई : परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ३१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेण्यासाठी वाढीव मुदतीची मागणी केली.
या बैठकीनंतर मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, औरंगाबाद विद्यापीठ, SNDT, सोलापूर विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, गोंडवाना, कलसंचनालय, BATU, जळगाव विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी युजीसीकडून ३१ ऑक्टोंबर पर्यंत तर अमरावती व यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाने १० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
खुशखबर : राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरु होणार
अंतिम वर्ष परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केल्यानुसार, कुलगुरू व विद्यापीठांचे परीक्षा विभाग आज वा उद्यापर्यंत परीक्षा कोणत्या पद्धतीने व कधी घेतल्या जातील याबद्दल महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
धर्मगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज कालवश!
तर, मंत्री उदय सामंत हे आज सकाळी ११ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते अंतिम वर्ष परीक्षांबाबत कुलगुरूंनी मांडलेली भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट करतील. उदय सामंत यांनी काल रात्री ट्विट द्वारे माहिती दिली आहे.” उद्या (दि. २सप्टेंबर) सकाळी 11.00 वाजता मी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात घेणार आहे.. ह्यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा संदर्भातील भावना आणि शासनाची भूमिका ह्याबाबत चर्चा करणार आहे. कुलगुरू सोबत बैठकीची माहिती देखील देणार आहे.”, असे त्यांनी सांगितले.
उद्या सकाळी11.00वाजता मी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात घेणार आहे.. ह्यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा संदर्भातील भावना आणि शासनाची भूमिका ह्याबाबत चर्चा करणार आहे. कुलगुरू सोबत बैठकीची माहिती देखील देणार आहे.
— Uday Samant (@samant_uday) September 1, 2020
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा देता येतील अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या सुचना दिल्या असून ऑनलाइन पद्धतीने जरी परीक्षा घेतल्या गेल्या तरी त्याचा पॅटर्न कसा असेल? राज्यातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच इतर बाहेर राज्यातुन आलेल्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर पडेल का? अशा निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर खुलासा केला जाऊ शकतो.
अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले मुळा धरण ओव्हरफ्लो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

