Share

पवारांच्या बारामतीत धक्कादायक प्रकार, रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामॉल भरून…

Published On: 

बारामती : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल १ हजार ३४१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या ४ दिवसांपासून रोज देशभरात १ हजारहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांची आकडेवारी पाहाता देशभरात एकूण २ लाख ३४ हजार ६९२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

महाराष्ट्रात देखील कोरोनाची स्थिती अधिक भयावह होत आहे. राज्यात काल (१६ एप्रिल ) ६३ हजार ७२९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल ५९ हजार ५५१ जणाचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत राज्याची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेरेमडेसिविरचा प्रचंड तुडवडा प्रत्येक जिल्ह्यात जाणवत आहे. रुग्ण बेड्स अभावी जीव सोडत आहेत. तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी पळापळ करावी लागत आहे.

अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बारामतीत रेमडेसिविर इंजेक्शनमध्ये पॅरासिटामॉल मिसळून इंजेक्शन म्हणून देणा-या चौघांना बारामती तालुका पोलिसांनी काल (१६ एप्रिल ) रात्री पकडले.

1300 रुपयांचे रेमडेसिविर इंजेक्शन 35 हजाराला विक्री करणा-या एका युवकाला जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून ही माहिती उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. ही इंजेक्शन घेतल्याने काही रुग्णांचा मृत्यूही झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून या बाबत पोलिस सखोल तपास करणार आहेत.

बारामती शहरातील फलटण चौकात रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी संबंधित युवकाने बोलाविल्यानंतर सापळा लावून तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एक इंजेक्शन 35 हजार या प्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार रुपये घेतले गेले.

पोलिसांनी या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या झालेल्या रेमडेसिविरच्या मोकळया बाटल्या आणून त्यात सिरींजने पॅरासिटीमॉल मिसळून पुन्हा फेव्हिक्विकच्या मदतीने या बाटल्या बंद करुन पुन्हा त्या बाजारात नव्या म्हणून काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरु होता. या बाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले असून आता लवकरच या बाबत फिर्याद दिली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!