देहरादून – देहरादूनमध्ये पौरोहित्याचे काम करणारे पंडित शिवांनद कोटनाला यांनी सलूनचालकाविरोधात दाखल केलेल्या एफआयआरची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. सलूनवाल्याने केस कापताना त्यांची शेंडीही कापून टाकल्याने वाद निर्माण झाला व यातूनच पुढे हा एफआयआर करण्यात आल्याचे समोर येत आहे. नेहरू कॉलोनी पोलीस ठाण्यात त्या सलूनवाल्यावर गुन्हा दाखल केला.
शिवांनद कोटनाला नुकतेच नवादातील भावेश जेंट्स सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते. सलूनवाल्याने केस कापताना त्यांची शेंडीही कापून टाकली. घरी गेल्यावर शिवंनद यांना न्हाव्याने आपली शेंडी कापल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात ते सलून चालकाकडे गेले त्याठिकाणी चांगलेच भांडण या दोघांमध्ये झाले.
यानंतर शिवांनद यांनी थेट पोलीस ठाणे गाठत सलूनचालकाविरोधात तक्रार दाखल केली. वादावादी वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सलूनचालकाविरोधात एफआयआर दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवांनद रविवारी भावेश जेंट्स सलूनमध्ये केस कापायला गेले होते. केस कापून झाल्यावर त्यांनी केसांना कलपही करून घेतला. घरी गेल्यावर केसांचा रंग सुकल्यावर ते आंघोळीसाठी गेले. त्यावेळी आपली शेंडी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर ते सलूनचालकाला जाब विचारायला गेले असता त्याठिकाणी मोठे भांडण झाले. आता शिवांनद यांनी पोलीस ठाण्यात सलूनचालक भावेश यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करत ठार मारण्याची धमकी देणे अशी तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत सलूनचालक भावेशविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नीरज चोप्रचा ‘फॅट-टु-फिट’ प्रवास पाहून अर्जुन कपूरने केले कौतुक, म्हणाला….
- आता केवळ एका मिस्ड कॉलद्वारे करता येणार गॅस सिलेंडरचे बुकिंग
- … तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली ? राष्ट्रवादीचा भाजपला थेट सवाल
- टी-२० विश्वचषकासाठी न्युझीलंडच्या संघाची घोषणा; ‘हा’ अनुभवी खेळाडू संघाबाहेर
- मेडल मोदी जी जीतकर लाये है क्या? कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केली नाराजी


