Share

नीरज चोप्रचा ‘फॅट-टु-फिट’ प्रवास पाहून अर्जुन कपूरने केले कौतुक, म्हणाला….

Published On: 

मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारली होती. यासह नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची आशा लागली होती. त्याने भारतीयांची आशा पूर्ण केली. आणि शनिवारी नीरज अंतिम फेरी खेळला आणि त्याने भारताला सुवर्ण पदक मिळून दिले. पुरुष भालाफेक स्पर्धेत ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा यापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. नीरजवर सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने देखील त्याचे अभिनंदन केले आहे.

अर्जुन कपूरने नीरजची मेहनत पाहून आश्चर्यचिकत झाला आहे. नीरजचे वजन १२ वर्षांचा असताना ९० किलो होते. लठ्ठपणाचा सामना केल्यानंतरही त्याने हार मानली नाही. त्याने या सगळ्या गोष्टींवर मत करत आज भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. अर्जुन हा नीरजच्या विजयामुळे आणि त्याचं वजन कमी करण्याचा प्रवास पाहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अर्जुनने नीरजचे कौतुक केले आहे.

arjun kapoor, neeraj chopra

 

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘लठ्ठपणाशी लढणे म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण थकतो. नीरज चोप्राने केवळ लठ्ठपणावर मात केली नाही, तर देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीरज, तू माझ्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहे’, असे कॅप्शन अर्जुनने या पोस्टला दिले आहे.

अर्जुनची ही पोस्ट सोशल मीडियावर अनेकानाचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान याआधी अर्जुनचे वजन देखील १५० किलोच्या आसपास होते. बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याआधी अर्जुनने खूप मेहनत केली आणि त्याचे वजन कमी केले होते आणि आता सध्या बॉलीवूडमध्ये अर्जुन कपूर देखील एक आघाडीचा अभिनेता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!