Share

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत.

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात दाद मागण्यासाठी सूचना केली होती.

दरम्यान, यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश देत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सीबीआयकडून आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे असून ते कोर्टात जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!