औरंगाबाद : डीसीएचसीला स्वतः चा ऑक्सिजन प्लांट लवकर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी फुलंब्री तालुक्यातील त्यांच्या दौऱ्या दरम्यान केले. गोंदवले यांनी बिल्डा शिवारामधील शासकीय कोविड केअर सेंटर सीसीसी आणि सद्गुरु हॉस्पिटलचे खाजगी कोवीड हेल्थ सेंटर डीसीएचसी येथे देखील भेट दिली. या वेळी त्यांनी सीसीसी मधील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी देखील केली.
सीसीसी मधील कामाची पाहणी केली आणि कामाबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान सद्गुरु हॉस्पिटल, बिल्डा ( ता. फुलंब्री) येथील खाजगी डीसीएचसी मधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. डीसीएचसी ला स्वतः चा ऑक्सिजन प्लांट लवकर सुरू करण्यास सांगितले. या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, गणोरी येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच स्वतः कोवीड प्रतिबंधक लस घेतली. वेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी येथे कोवीड तपासणी टेस्टिंग चे काम वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या वेळी गोंदवले यांनी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी येथील विविध खासगी तसेच ग्रामीण आरोग्य केंद्राला भेट देवून तेथील सर्व यंत्रणा कश्या आहेत. तर ऑक्सिजन, लसीचा पुरवठा, रेमिडिसिविर तसेच डाॅक्टरांचा स्टाप, नर्सेससह इतर सर्व आरोग्य कर्मचारी तसेच अधिकारी याची भेट घेवून सर्व स्तरावरील औषधोपचाराबाबत माहिती घेवून ज्या गोष्टीची कमतरता दिसली त्या बाबतीत दुरुस्ती करावी तसेच यंत्रणा कश्या प्रकारे चांगली करण्यात येणार असल्याचे देखील या वेळी सुचना देखील देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची टंचाई, मात्र ५०० ऑक्सिजन बेड रिकामे!
- मराठा आंदोलनाला मोठे यश, ‘या’ चार मागण्या झाल्या मान्य!
- ‘आता लस देताना मोदी रडतायत; जुमलेबाजीवर सरकार टिकत नाही, सत्ताजीवी भाजपने लक्षात ठेवावं’
- प्रशासनाची काॅन्टॅक्ट हिस्ट्री तपासणीकडे डाेळेझाक; उस्मानाबादेत काेराेना स्प्रेडर फिरताहेत खुलेआम
- ‘भाजप नेते लोकांच्या मृतदेहावर उभे राहून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

