मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्तेचा मुद्दा नाना पटोले यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. आदिवासी समाजाचे डेलकर हे सातवेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांना प्रचंड मरण यातना देण्यात आल्या. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले पण शेवटी मुंबईत येऊन जीवनयात्रा संपवली.
त्यांच्या १५ पानाच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
डेलकर यांनी त्यांच्या व्यथा पंतप्रधान, गृहमंत्री आणि संसदेतही मांडल्या. त्यांना कशाप्रकारे त्रास दिला गेला हे त्यांच्या १५ पानी सुसाईड नोटमधील वर्णन वाचले तर अंगावर काटे येतील. या सुसाईड नोटमध्ये गुजरातचे माजी गृहमंत्री प्रफुल्ल खोडा पटेल यांचे नाव आहे. त्यांना भाजपाने दादरा नगर हवेलीचे प्रशासक म्हणून बसवले आहे. या प्रकरणात कोणी कितीही मोठे असले तरी ते कायद्यापेक्षा माठे नाहीत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.
ज्यांच्यावर देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी आहे, अशा सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती.
महत्वाच्या बातम्या
- नॉट रिचेबल ग्रामविकास अधिकारी लग्नकार्यात व्यस्त, जोगेश्वरी ग्रामस्थांची व्यथा
- परभणीमध्ये लॉकडाऊन नको, संचारबंदीसाठी व्यापाऱ्यांची सहमती
- शेतकरी आंदोलनावर गप्प का आहेस? ; शेतकर्याने अडवली अजय देवगणची गाडी
- बायकोला माहेरी नेल्याने सासू-सासऱ्याला बेदम मारहाण
- कोल्हापुरात जात पंचायतीची धक्कादायक घटना, प्रेमविवाह तोडण्यासाठी तरुणीला…


