🕒 1 min read
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी मागील काही दिवसापासून लग्न कार्यात, मिटिंगमध्ये व्यस्त असल्याचे कारणे देत सतत नॉट रिचेबल येत असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहे. अनेक दिवसापासून ग्रामविकास अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे गावातील विकास कामांना ब्रेक लागल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांच्या कार्यावर शंका उपस्थित केल्या जात आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात अनेक छोट्या मोठ्या कामासाठी ग्रामस्थ मागील काही दिवसापासून चकरा मारत आहे. परंतु ग्रामविकास अधिकारी भिमराव भालेराव उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांना हताश होऊन परतावे लागत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येते तर ग्रामविकास अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा सल्ला देण्यात येतो. ग्रामविकास अधिकाऱ्यांना संपर्क केला असता लग्नात आहे, मयतीत आहे,आजारी आहे, बाहेर गावी आहे, मिटिंग मध्ये आहे असे उडवाउडवीचे उत्तरे ग्रामविकास अधिकारी देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामविकास अधिकारी भालेराव यांच्या सतत गैरहजेरी मुळे गावातील समस्या वाढल्या असून नागरिकांना मुलभूत सुविधापासून वंचित रहावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ग्रामविकास अधिकारी यांना कायमस्वरूपी सुट्टीवर पाठवावे व कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी देऊन ग्रामपंचायत जोगेश्वरीचा कारभार सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी भिमराव भालेराव यांना संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही.
महत्वाच्या बातम्या
- मोक्षदा मॅडम, अधिकाऱ्यांवर जरा लक्ष ठेवा, एसीबीने पीएसआयला ओढले जाळ्यात
- परभणीमध्ये लॉकडाऊन नको, संचारबंदीसाठी व्यापाऱ्यांची सहमती
- शेतकरी आंदोलनावर गप्प का आहेस? ; शेतकर्याने अडवली अजय देवगणची गाडी
- बायकोला माहेरी नेल्याने सासू-सासऱ्याला बेदम मारहाण
- कोल्हापुरात जात पंचायतीची धक्कादायक घटना, प्रेमविवाह तोडण्यासाठी तरुणीला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
