🕒 1 min read
मुंबई : शेतकरी आंदोलनाला समर्थन का देत नाहीस? असा सवाल करत मुंबईतल्या गोरेगावमध्ये अभिनेता अजय देवगणची कार एकानं रस्त्यात रोखून धरली. शेतकरी आंदोलनाशी संबंधीत या व्यक्तीनं सुमारे पंधरा मिनिटं कार रोखून धरली.
शेतकरी आंदोलनावर गप्प का आहेस? आंदोलनला विरोध का केला असंही हा व्यक्ती म्हणताना दिसतोय. तब्बल १५ मिनिटे या व्यक्तीनं अजयची कार अडवली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
राजदीप सिंह (२८) असं अटक व्यक्तीचं नाव आहे. बॉलिवूडमधील सिंघम अजय देवगणची कार शेतकरी चळवळीशी संबंधित व्यक्तीने अडवली. अजय देवगण शूटिंगसाठी फिल्मसिटीला जात असताना निहंगसिंग नावाच्या या व्यक्तीने त्याची कार थांबविली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा का देत नाही असा प्रश्न विचारु लागला.
मंगळवारी सकाळी गोरेगावमधील दिंडोशी परिसरातील ही घटना घडली. अजय देवगण आपल्या कारच्या आत बसलेला दिसत आहे. आरोपी राजदीप सिंह देवगणला पंजाबचा शत्रू म्हणून बोलतो. आरोपी व्यक्ती दिल्लीत बरेच दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत, पण अजय देवगण त्यांच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाहीत असा जाब त्याला विचारत आहे. फिल्मसिटीनजीक परिसरात जवळपास १५ ते २० मिनिटे हा गोंधळ सुरूच होता. पोलिसांनी राजदीपला अटक केली आहे.
आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने आंदोलनाविषयी ट्वीट केले असता अजय देवगणची एन्ट्री झाली होती, त्यास उत्तर म्हणून अजय देवगणने ट्वीट करत म्हटलं होतं की, ही देशासाठी सर्वात वाईट घटना आहे. अक्षय कुमार, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अजय यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींनी अशीच ट्वीट केली होती, नंतर महाराष्ट्र सरकारनेही या सर्व ट्वीटची चौकशी करण्याची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- कोल्हापुरात जात पंचायतीची धक्कादायक घटना, प्रेमविवाह तोडण्यासाठी तरुणीला…
- पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात अजितदादा राबवणार ‘सांगली पॅटर्न’ ?
- काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
- दृष्टचक्र! पन्नास रुपये किलो विकणारा टोमॅटो मिळतोय अवघ्या पाच रुपयांत
- ‘राष्ट्रवादीचे आ.संदिप क्षीरसागर यांचे राजकारण स्वार्थी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
