🕒 1 min read
जालना : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोला माहेरी आणल्याने जावयाने सासू-सासऱ्यांवर कुऱ्हाडीने वार केला. ही घटना परतूर तालुक्यातील काऱ्हाळा येथे घडली. याप्रकरणी जावायाविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काऱ्हाळा येथील ज्ञानेश्वर गणपत राठोड यांच्या मुलीचे लग्न परतवाडीतांडा येथील अमोल लक्ष्मण आढे याच्यासोबत झाले आहे. पण काही कारणामुळे पती-पत्नीचे वाद झाल्याने त्याची पत्नी माहेरी आली होती. दरम्यान ज्ञानेश्वर राठोड हे सोमवारी रात्री जेवण करून पत्नी आणि मुलीसह घरासमोर बसलेले होते. यावेळी त्यांचा जावई अमोल लक्ष्मण आढे हा तिथे आला.
त्याने ‘तुम्ही माझ्या पत्नीला माहेरी का आणले’, असे म्हणत त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सासूवरही कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. याचबरोबर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ज्ञानेश्वर राठोड यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अमोल आढे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास जमादार जगन्नाथ सुक्रे हे करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ५ कोटींचा आरोप, पूजाच्या वडिलांची शांताबाईविरोधात पोलिसांत तक्रार
- डीसीसीतील भाजपच्या इच्छुकांना पुन्हा धक्का, कोर्टाने याचिका फेटाळली
- अवैध वाळू विरोधात आ.पवारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण
- काळजी घ्या! ‘या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता
- दृष्टचक्र! पन्नास रुपये किलो विकणारा टोमॅटो मिळतोय अवघ्या पाच रुपयांत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
