Share

रुग्णालयात नर्सच्या वेशात आली आणि बाळ पळवून गेली; पोलिसांनी ‘असा’ लावला छडा

Published On: 

पुणे : रुग्णालयातून बाळ पळवून नेल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. आता पुण्यातील ससून रुग्णालयातील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत असून बाळ पळवणाऱ्या टोळ्या अनोख्या शक्कल लढवत असल्याच समोर आलं आहे. बाळ चोरणारी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी लगेच छडा लावत आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे.

कोणाला संशय येऊ नये म्हणून चोरट्या महिलेने चक्क नर्सच्या वेशाची मदत घेतली. ससून रुग्णालयात नर्स म्हणून प्रवेश केल्यानंतर ठरल्याप्रमाणे बाळाला पळवले. यानंतर आईला आपले बाळ कुठेच न दिसल्याने आरडा ओरडा केला. त्यानंतर हॉस्पिटमधून बाळ चोरीला गेल्याचं समजलं. या बाळाचं वय अवघे ३ महिने होते. रुग्णालय प्रशासनाला ही महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समजले.

या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींचा छडा लावत ते बाल सुखरूप आईकडे परत केले. अनेकदा बाळ चोरीच्या घटना समोर येत असतात, मात्र या चोरीमागे महिलेचा उद्देश काही वेगळाच होता. या महिलेला मूल होत नव्हतं. त्यामुळे या महिलेने हा कारनामा केल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. मात्र असं असलं तरी, या निमित्ताने ससून रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!