🕒 1 min read
मुंबई: उपनगर साकीनाका येथे एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला आहे. आता साकीनाका बलात्कार प्रकरणी वेळेत चार्जशीट दाखल करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या घटनेवरूनच भाजपचे आशिष शेलार यांनी संतप्त सवाल केला आहे. ‘उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेल्या साकीनाका येथील बलात्कार पिडीतेच्या नातेवाईक आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांची राजावाडी रुग्णालयात जाऊन आशिष शेलार यांनी भेट घेतली. अत्यंत संतापजनक ही घटना असून मुंबईत गुन्हेगारी एवढी मोकाट का झालीये? पोलीसांचा धाक का राहिला नाही? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
We will make sure that the charge-sheet is filed within a given frame of time & the case is fast-tracked to bring the accused to justice: Maharashtra Minister Nawab Malik on Mumbai rape case pic.twitter.com/nj9jD5AwcT
— ANI (@ANI) September 11, 2021
तर चित्रा वाघ यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. तर कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एक आरोपी पकडला आहे. मी पोलिसांशी बोललो. निर्भया प्रकरणासारखीच ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. थोड्या कालावधीत एका आरोपीपर्यंत पोहोचलो. इतर आरोपीही पकडले जातील. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, असं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- गणेश पुजनासाठी गेल्याने ट्रोल झाली अर्शी खान; मात्र व्हिडिओच्या माध्यमाने दिलं तडेतोड उत्तर
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
